माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राजापूर ची कार्यकारणी संपन्न

Jul 1, 2024 - 10:12
 0
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राजापूर ची कार्यकारणी संपन्न

■ राजापूर मधील भ्रष्टाचार संपवू : तालूका अध्यक्ष, प्रशांत पोवार
 
राजापूर, आडिवरे : माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र मधील राजापूर च्या कार्यकर्त्या ची सर्वसाधारण सभा दि.३० जून २४ ला आडिवरे या ठिकाणी माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र चे राज्य सचिव श्री. समीर शिरवडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राजापूर मधील चाललेले अनधिकृत कारभार आणि त्यावर अधिकाऱ्यांचा चाललेले  कारभार या विरोधात या सभेत आवाज उठविण्यात आला.

या सभेत लांजा तालुक्या चे सचिव विलास नारकर, संगमेश्वर अध्यक्ष शेखर जोगळे, तालुका अध्यक्ष प्रशात पोवार यांनी आपली मते मांडली. जिल्हा अध्यक्ष मनोहर गुरव यांनी अपल्या भाषनात सर्व कार्यकर्त्याच्या शंकाचे निरसन केले. माहिती अधिकार महासंघचे सचिव समीर शिरवडकर यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या १ ते ३१ क कलमाचा अभ्यास करून कसे अधिकाऱ्यां सामोरं जावे याचे अमुल्य मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र सचिव समीर शिरवडकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मनोहर गुरव, उपाध्यक्ष बोतले, जिल्हा सचिव पद्धनाभ कोठाकर, राजापूर तालूका अध्यक्ष प्रश्नात पोवार, लांजा सचिव विलास नारकर, तालुका उपाध्यक्ष उदय गिरकर, विशाल सरफरे, सचिव पुरुषोत्तम खांबल, सह सचिव रूपेश कोठाकर, पावस चे अध्यक्ष प्रथमेश पावसकर, संगमेश्वर अध्यक्ष शेखर जोगळे, अक्षय डबरे, अमोल सोगंम, राकेश आरंबेकर, नितीन करगुटकर, रुपेश गुरव उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री बोटले यांनी करून आभार करून कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow