रत्नागिरी : नासा सफरीसाठी जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांची निवड

May 29, 2024 - 10:17
May 29, 2024 - 10:20
 0
रत्नागिरी : नासा सफरीसाठी जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाची गोडी लागावी यासाठी सलग दुसऱ्या वर्षी नासाची (अमेरिका) सफर घडविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. हे सर्व विद्यार्थी ५ जून रोजी अमेरिकेला रवाना होणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी (ता. २८) रत्नागिरीत बोलावण्यात आले आहे.

नासा व इस्त्रो या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हापरिषद शाळास्तरावर २५१ केंद्रांवर २० हजार ५११ विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधून एकूण ५५ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यातील १० विद्यार्थी येत्या ५ ते १७ जून रोजी नासासाठी रवाना होतील. त्यांच्यासोबत जिल्हापरिषदेतील अधिकारी, शिक्षक, डॉक्टर असे सहा जण जाणार आहेत. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले आहेत. तेथे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद साधतील. गतवर्षी जिल्हापरीषदेच्या ९ विद्यार्थ्यांना नासाची सफर घडवण्यात आली होती. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी नासा दौऱ्यासाठी अधिकची तरतूद करू असे सांगितले होते. त्यानुसार या दौऱ्यासाठी १ कोटी ७१ लाख रूपये निधी ठेवण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांची संख्याही वाढवण्यात आली. जिल्हापरीषद शाळांमधील मुलांमधून संशोधक निर्माण व्हावेत यासाठी हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांच्या संकल्पनेतून सलग दोन वर्षे राबवण्यात येत आहे.

नासासाठी निवड झालेले विद्यार्थी
ओम शैलेश कोबनाक (देव्हारे), आक्षा संदीप आग्रे (चिंचघर), मानिनी मंगेश आग्रे (मळे), शुभम जयंत जोशी (कोळथरे), सार्थक प्रकाश महाडिक (धामणदेवी बेलवडी), किर्ती केशव मुंढे (असगणी नं. २), दक्ष दिनेश गिजये (जि.प.शाळा पाग), इच्छा सिताराम कदम (अनारी), विराज विष्णू नाचरे (पाभरे), पूर्वा उमेश जाधव (पिंपर नं.१), प्रसाद सतीश धामसेकर (डिंगणी, गुरववाडी), स्वराज दिलीप पाक्तेकर (डिंगणी, खाडेवाडी), सिध्दी भीमराव पाटील (छ. शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं. ४), ऋषभ गौतम गायसमुद्रे (कुवारबाव महालक्ष्मीनगर शाळा क्र. २), श्रेया संदीप आग्रे (कोळीसरे नं. १), प्रणव लक्ष्मण कोलगे (जावडे क्र. १), सुमेध सचिन जाधव (शिरवली), जस्लिन फैय्याज हाजू (खरवते नं. १), शर्वरी सुघोष काळे (गुजराळी), शमिका संतोष शेवडे (कोतापूर नं. १).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 29/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow