खेड : तळे महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना साहित्यगौरव पुरस्कार

Jul 3, 2024 - 10:32
 0
खेड : तळे महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना साहित्यगौरव पुरस्कार

खेड : तालुक्यातील तळे महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना राज्यस्तरीय साहित्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थेच्यावतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे निर्माता, दिग्दर्शक नितीन देशमुख, आशिष सातपुते, अभिनेत्री मानसी राणे, मेघा डोळस निर्माता, गीतकार गायिका कडूबाई खरात या मान्यवरांच्या हस्ते कांबळे यांना गौरवपत्र, मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. कांबळे यांचे सच्चा समाजसेवक बहुजनांचा सखा, प्रातिनिधिक दोन कवितासंग्रह, अनेक वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक लेख प्रकाशित झाले आहेत तसेच मी बिघडलो कथासंग्रह, सांज कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow