दापोली एसटी डेपोत डिझेलच्या तुटवड्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांचे हाल

May 29, 2024 - 10:43
 0
दापोली एसटी डेपोत डिझेलच्या तुटवड्याने गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले; प्रवाशांचे हाल

दापोली : दापोली एसटी आगारात वेळेत गाड्या न सुटणे, अचानक गाडी रद्द करणे, अशा तक्रारी कायम आहेत. यात भर म्हणून दि. २८ रोजी आगारातील डिझेल संपल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावल्या. तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील गाड्या उशिरा धावल्याने लोकांचे चांगलेच हाल झाले.

काही दिवसांपासून दापोली आगारात काँक्रिटीकरण काम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी जागेत एसटी व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी धूळ असून, बसण्याची नीट व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक प्रवासी हे धुरळ्यात बसले होते. यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल झाले. प्रचंड उकाडा असल्याने याचा त्रास अनेक प्रवाशांना झाला. दापोली आगाराच्या या कारभारात वरिष्ठांनी लक्ष घालून सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, डिझेल पुरवणारी गाडी ट्रॅफीकमध्ये फसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. यासाठी मंडणगड आगारातून डिझेल भरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत, असे दापोली आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow