मांडवी येथे बंद घराला आग

Aug 10, 2024 - 10:33
 0
मांडवी येथे बंद घराला आग

रत्नागिरी : शहरातील मांडवी-भूते नाका येथील एका बंद घराला गुरुवार ८ ऑगस्ट रोजी रात्री १० वा. सुमारास आग लागली. घर बंद असल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून शुक्रवारी सायंकाळपर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

रात्री या बंद घरातून अचानकपणे आगीच्या ज्वाळा आणि धुर येउ लागताच आजुबाजुच्या नागरिकांनी तातडीने रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगिवर नियंत्रण मिळवले. आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow