भाट्ये खाडी गाळाचा प्रश्न प्रलंबितच..

May 31, 2024 - 11:01
May 31, 2024 - 15:02
 0
भाट्ये खाडी गाळाचा प्रश्न प्रलंबितच..

रत्नागिरी : भाट्ये खाडीमुखाजवळ पुलापासून मांडवीबंदरापर्यंत मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याने, मच्छीमारी नौकांना कसरत करतच मार्ग काढावा लागत आहे. गेली काही वर्षे सातत्याने मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. भाट्ये खाडीवर अवलंबून असणारे मच्छीमार सातत्याने मागणी करूनही हा प्रश्न अधांतरीच राहिलेला आहे. 

भाट्ये खाडीवर राजिवडा, कर्ला, भाट्ये, नवा फससोप या भागातील मच्छीमार अवलंबून आहेत. मच्छीमारांच्या नौका समुद्रात नित्यनियमाने मच्छीमारीसाठी जात असतात. परंतु मागील अनेक वर्षापासून येथील गाळाचा प्रश्न प्रलंबित आहे. मच्छीमारांकडून बारंवार गाळ उपशाची मागणी होते. परंतु आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. त्यामुळे गतवेळी जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने गठीत करण्यात आली होती. याबाबत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. परंतु त्यावेळीही आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही. मांडवी बंदरातून समुद्रात ये-जा करण्यासाठी मासेमारी नौकांना समुद्राला येणाऱ्या भरतीची वाट पहावी लागते. या गाळामुळे अनेकदा नौका बुडून लाखो रुपयांचे मच्छीमारांचे नुकसान झालेले आहे. शिवाय नौकांवरील खलाशी बुडाल्याच्या दुर्दैवी घटनाही येथे घडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मांडवी बंदरातील गाळ उपसा करणेबाबत राजिवडा, कर्ला, फणसोप आणि भाट्ये येथील मच्छीमार संस्थांकडून मागणी करण्यात आलेली असतानाही त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम म्हणून खाडी परिसरातील मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पुढील हंगाम सुरू होताना येथील गाळाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाची तयारी आतापासूनच मच्छीमारांनी केली आहे.

लढा उभारण्याच्या हालचाली
जमातुल मुसस्लिमीन राजिवडा कोअर कमिटीचे नजीर वाडकर, कार्याध्यक्ष इम्रान सोलकर, शब्बीर भाटकर यांच्या माध्यमातू पाच गावांमध्ये जनजागृती करुन, संघर्ष उभा करण्यात आला. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यावेळी लवकरच गाळ काढण्याचे आश्वासन मिळाले. परंतु आता तीव्र लढा उभा करण्याच्या दृष्टीने मच्छीमारांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 31-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow