गोहत्या प्रकरण : निलेश राणेंनी दिला इशारा...

Jul 5, 2024 - 11:29
 0
गोहत्या प्रकरण : निलेश राणेंनी दिला इशारा...

रत्नागिरी : रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार काल रात्री समोर आला आणि एकच खळबळ उडाली. अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून वासराचे अवशेष रस्त्यावर पडल्याने हा प्रकार लोकासंमोर आला. हि घटना समजतात गोरक्षक संस्था आणि गोप्रेमी नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आपला रोष व्यक्त केला. दरम्यान मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक गोळा झाले व त्यांनी पोलीस प्रशासनाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. या घडणाऱ्या प्रकारांबाबत यापूर्वी देखील पोलिसांना कल्पना देऊन त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गोप्रेमी नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी केला आहे. जोपर्यंत हि वाहतूक करणारा टेम्पो पोलीस शोधून आणत नाहीत तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना या ठिकाणी मोठा जमाव गोळा झाला. उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यावर वाढीव पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे देखील ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जमावामध्ये थोडी वादावादी देखील झाली. आम्हाला या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी 48 तासांची मुदत द्या आम्ही संबंधितांवर कठोर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांकडून दिल्यावर रात्री तीन वाजता जमाव माघारी फिरला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow