रत्नागिरीत धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेची ७ जुलैला निवड चाचणी

Jul 6, 2024 - 11:51
 0
रत्नागिरीत धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेची  ७ जुलैला निवड चाचणी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनची १०, १३, १५ वर्षे वयोगटातील राज्य धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली सन २०२४-२५ चे आयोजन अमरावती येथे दि.१४ ते १६ जुलै, २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जन्मतारीख १० वर्षे वयोगटासाठी १ जानेवारी २०१५, १३ वर्षे वयोगटासाठी ०१ जानेवारी २०१२, १५ वर्षे वयोगटासाठी ०१ जानेवारी २०१० नंतर जन्मलेले मुले व मुली सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. ही स्पर्धा कंपाऊंड, रिकर्व व इंडियन या ३ प्रकारात घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या अनुषंगाने दि. ७ जुलै, २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, खुले नाट्यगृहाशेजारी, मारुती मंदिर, रत्नागिरी, जि. रत्नागिरी येथे सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.

या पात्र खेळाडूंनी क्रीडा प्रकाराचे साहित्य व वयाच्या मूळ दाखल्यासह उपस्थित राहावे. या निवड चाचणीमधून रत्नागिरी जिल्हा संघाची निवड केली जाईल. कमीत कमी ४ खेळाडूंचा सहभाग असेल तर गटातील प्रथम ३ क्रमांकांना मेडल दिली जातील. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा असोसिएशनच्या सचिव श्रीमती समिधा संजय झोरे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मार्तंड झोरे ९३७०२१५५२२, ९०२१३८१८५८, ९८८१२२७६९९ यांच्याशी संपर्क साधण्यास कळवण्यात आले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 06/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow