रत्नागिरी : एमआयडीसीतील बाल्को प्रकल्पाच्या जागेत प्रकल्पग्रस्तांनी भात शेती लावून केले आंदोलन

Jul 10, 2024 - 11:34
Jul 10, 2024 - 11:36
 0
रत्नागिरी :  एमआयडीसीतील  बाल्को प्रकल्पाच्या  जागेत प्रकल्पग्रस्तांनी  भात शेती  लावून केले आंदोलन

रत्नागिरी : रत्नागिरीत बाल्को प्रकल्पासाठी ५७ वर्षापूर्वी संपादित झालेल्या जागेवर अद्यापही कोणताच प्रकल्प न झाल्याने, प्रकल्पग्रस्त भूमिहीन शेतकऱ्यांनी मंगळवारी एमआयडीसीच्या ताब्यात असणाऱ्या या जागेवर जात सामूहिक शेती करीत आंदोलन केले आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरीत सन १९६७ साली भारत सरकारने बाल्को या कंपनीमार्फत अॅल्युमिनियम प्रकल्प करण्यासाठी रत्नागिरी येथील १२०० एकर जागा संपादित केली होती. या जमिनीवर प्रकल्प न उभारता नंतर ती जमीन भांडवलदरांना देण्याचा प्रयत्न झाला. या जमिनी परत मिळवण्यासाठी गेली सुमारे ५३ वर्षे भूमिहीन शेतकऱ्यांमार्फत लढा दिला जात आहे.

पण त्या लढ्याची शासनाने आजपर्यंत कोणतीच दखल घेतलेली नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे मत बनत चालले आहे. त्यामुळे ९ जुलै रोजी रत्नागिरी शहरानजिक अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी येथील जमिनींवर जाऊन सामूहिक शेती करीत आंदोलन केले.

मंगळवारी सकाळी परटवणे नाका येथे सर्व शेतकरी एकत्र झाले आणि चंपक मैदान परिसरातील सीमा देवी मंदिर येथे धडक दिली. या ठिकाणी नांगर, कुदळ, फावडी, घमेले, शेत लावणीसाठी भातरोपे घेऊन सामुहिक शेत लावत आंदोलन केले. प्रकल्प आंदोलनात अग्रेसर असलेले राजेंद्र आयरे यांनी पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow