चिपळुणातील स्नेहा, सायुरी, अथर्व दिव्या, सायली यांचे सी. ए. परीक्षेत यश

Jul 12, 2024 - 10:08
Jul 12, 2024 - 10:09
 0
चिपळुणातील स्नेहा, सायुरी, अथर्व  दिव्या, सायली यांचे  सी. ए. परीक्षेत यश

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर भागात श्रीराम एज्युकेशन राहणारी सोसायटीच्या परांजप मोतीवाले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी सायुरी दत्ताराम गवळी आणि दसपटीतील टेरव येथील अथर्व श्रीधर कदम सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

सी. ए. होणे हे समाजात मानाचे मानले जाते. सी. ए.ची परीक्षा अत्यंत कठीण व खडतर असते. त्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करावे लागतात. सी. ए. परीक्षेचा निकाल दोन ते चार टक्के लागतो असे सांगितले जाते. त्यामुळे या परीक्षेकडे विशेषत्वाने पाहिले जाते.

 स्नेहा ही मूळची दसपटी विभागातील कळकवणे गावची असून, तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्नेहाचे दहावीपर्यंत शिक्षण शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. यानंतर ज्युनियर कॉलेज तिने डी.बी. जे. महाविद्यालयात तर पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीमधील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. यानंतर पुणे येथे एका सी. ए. कडे तिने मार्गदर्शन घेतले. त्यानंतरच्या कालावधीत चिपळुणातील सी. ए. करमरकर यांच्याकडे ती मार्गदर्शन घेत होती. सायुरी गवळी ही परांजपे मोतीवाले हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथे तिने सी. ए. चे शिक्षण पूर्ण केले. टेरव येथील अथर्व कदम हा वापी येथून दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला व मुंबई येथे त्याने सी. ए. परीक्षा उत्तीर्ण केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे कळकवणे ग्रामस्थ, चिपळूण तसेच टेरव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

निरव्हाळमधील दोन सुकन्या सी. ए.
तालुक्यातील निरव्हाळ येथील दोन सुकन्या सी. ए. झाल्या आहेत. दिव्या सावंत तर सायली कदम या दोघींनी सी. ए. या परीक्षेत यश मिळविले आहे. एकाच गावातील दोन मुली एकाचवेळी सी. ए. झाल्याने निरव्हाळमध्ये आनंद व्यक्त होत आहे. निरव्हाळ येथील श्री सप्तेश्वर सेवा मंडळ मधलीवाडीचे अध्यक्ष विलास सावंत यांची दिव्या ही कन्या आहे. ती मुंबई येथे सी. ए. करीत होती. तसेच निरव्हाळ कुरणवाडी येथील हनुमान कदम हे मुंबईस्थित असून, त्यांची कन्या सायली हिनेदेखील सी. ए.चे शिक्षण मुंबई येथूनच घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow