जगबुडी पुन्हा धोक्याच्या पातळीवर..

Jul 25, 2024 - 09:41
 0
जगबुडी पुन्हा धोक्याच्या पातळीवर..

खेड : तालुक्यात गेल्या २४ तासांपासून उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत असून खेडमधील जगबुडी नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

गेल्या २४ तासांपासून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असून बुधवारी (दि. २४) अनेक ठिकाणी झाडे कोसळली होती. प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने झाडे तोडून बाजूला करत वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. जगबुडी नदी पात्रात पुन्हा पाण्याची पातळी वाढली असून बहिरवली खाडी भागात जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर शहराला पुराचा धोका असल्याने प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

खेडमध्ये गेल्या चोवीस तासांत ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण २ हजार ३४३.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी नदी किनाऱ्यावरील खेड बंदर रोड मार्गे देवणे पूल, तांबे मोहल्ला मार्गावर पुराचे पाणी आल्याने मार्ग रहदारीस बंद झाला आहे. तालुक्यात आपेडे शिरवली मार्गावर सोसाट्याच्या वाऱ्याने पडलेले झाड तोडून मार्ग मोकळा करण्यात आला आहे. शहरात मुसळधार पाऊस पडत असून जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे नागरीकांनी व व्यापारी बंधूनी आवश्यक ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन खेड नगर परिषद तर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow