Rain Alert : कोकणात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

Jul 12, 2024 - 10:06
 0
Rain Alert : कोकणात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

पुणे : राज्यात कमजोर झालेला मॉन्सून पुन्हा जोर धरण्यास पोषक हवामान होत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरी बरसणार असून, आज (ता. १२) तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

तर उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस सर्वसाधारण स्थितीवर पोहोचला असून, हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर पासून जयपूर, ओराई, बलिया, असनसोल, बागती ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय झाले आहे.

गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात हलक्या ते अति जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. दोडामार्ग येथे १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात ऊन सावल्यांचा खेळात एखाददुसरी सर सुखावून जात आहे. पावसाची उघडीप असलेल्या ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. आज (ता. १२) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे. तर पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि नाशिक, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' आहे. पूर्व विदर्भात विजांसह पावसाची, उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow