लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल इतरांसाठी आदर्शवत : पालकमंत्री उदय सामंत

Jul 15, 2024 - 10:45
 0
लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल इतरांसाठी आदर्शवत : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी :  लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल हा इतरांसाठी आदर्शवत ठरेल. या दवाखान्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
       

राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना/चिकित्सालयाचे बांधकाम या योजनेतून तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
        

याप्रंसगी मुंबई विभागाचे सहाय्यक प्रादेशिक आयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, शिरगाव गावच्या सरपंच फरिदा रज्जाक काझी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.धनंजय जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, अधीक्षक  अ‍भियंता  छाया नाईक उपस्थित होते.
      

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, अत्याधुनिक उपकरणे असलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा, पेशंटसाठी आवश्यक ओपीडी, ऑपरेशन थिएटर, मेटॉनॉलोजिकल अनॅलायझर, डिजीटल एक्स रे या सर्व गोष्टीने सुसज्य असा हा दवाखाना आहे. हा राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्शवत ठरेल. अशा प्रकारचा दवाखाना हे डॉ. पनवेलकर यांचे स्वप्न होते. ते पूर्ण होत आहे. ही त्यांना खरी आदरांजली आहे. पाळीव प्राण्यांवर काही लोक माणसांपेक्षा जास्त प्रेम करतात. अशा प्राण्यांसाठी फार मोठी सुविधा आपण उपलब्ध करुन देत आहोत. ती महाराष्ट्रातील नंबर १ सुविधा आपण पालकमंत्री असताना होत आहे, याचे समाधान होत आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow