चिपळूण : निवळी येथे देवराई पुनरुज्जीवनचा शुभारंभ

Jun 18, 2024 - 15:25
Jun 18, 2024 - 15:28
 0
चिपळूण : निवळी येथे देवराई पुनरुज्जीवनचा शुभारंभ

चिपळूण : तालुक्यातील निवळी येथे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रथमच श्री पावणाई देवी मंदिर बाराआणे देवस्थान कमिटी व नाम फाऊंडेशन आणि नाम वनसंजीवन अभियान अंतर्गत देवराई पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

येथील १८३ गुंठे जागेत १२५ प्रकारची १ हजार ६०० झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. निवळी ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची देवराई पुनरुज्जिवीत करण्यात येणार आहे. त्यासाठी पावणाई देवी मंदिर ट्रस्ट, रघुनाथ ढोले देवराई फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभणार आहे.

या कार्यक्रमाला चिपळूण पं. स.चे कृषी अधिकारी बी. बी. पाटील, सामाजिक वनीकरणचे अर्जुन जाधव, प्रथमेश पोमेंडकर, अशोक भुस्कुटे, अजित जोशी, जलदूत समन्वयक शाहनवाज शाह, सर्व ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow