रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Jul 16, 2024 - 10:57
 0
रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्य देणे या योजनेचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
            

अंधव्यक्तींसाठी, कर्णबधीर व्यक्तींसाठी, अस्थिव्यंग व्यक्तींसाठी व मतिमंद व्यक्तींसाठी सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने, दिव्यांग व्यक्तीना स्वयंरोजगबासाठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्तींसाठी घरकुल योजना, दिव्यांग- दिव्यांग व्यक्तींना विवाहसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. तसेच दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे यासारखे लाभ देण्यात येतात. तरी या योजनांचा दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow