पंढरपूरला दुचाकीवरून निघालेला चिपळूणचा वारकरी वाहनाच्या धडकेत ठार

Jul 17, 2024 - 11:51
Jul 17, 2024 - 11:56
 0
पंढरपूरला दुचाकीवरून निघालेला चिपळूणचा वारकरी वाहनाच्या धडकेत ठार

चिपळूण : येथून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दुचाकीवरून निघालेला पेढे मोरेवाडी येथील तरुण वाहनाच्या धडकेत ठार झाला. ही घटना मंगळवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी दिघंची येथे घडली. त्याच्यासोबत असलेला शहरातील पेठमाप गणेशवाडी येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे. रवींद्र बाळू मोरे (वय ४२, पेढे, मोरेवाडी, चिपळूण) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी, चिपळूण) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रवींद्र मोरे आणि सुधीर निवाते दोघेही मित्र असून ते दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी वारीला जात होते. यावर्षी त्यांनी आषाढी एकादशीच्या एक दिवस चिपळूणचा वारकरी वाहनाच्या धडकेत ठार आधी दुचाकीने पंढरपूरला जाण्याचा बेत केला. याप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने पंढरपूरला नेघाले होते. पंढरपूर मार्गावरील आटपाडी तालुक्यातील देघंची येथून जात असताना कोणत्या तरी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात रविंद्र मोरे हा दुचाकीसह स्त्याबाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. तसेच निवाते याच्या पायालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ सांगली येथील रूग्णालयात नेऊन उपचार सुरू केले आहेत. या अपघातात दुचाकीचे पुढील चाक निखळले असून मोठे नुकसान झाले आहे. यावरून या अपघाताची भीषणता लक्षात येते. या घटनेची माहिती मिळताच चिपळूणातील यांच्या नातेवाईकांनी सांगली येथे धाव घेतली. पंढरपूर नेथे गेलेले काही वारकरीदेखील घटनास्थळी पोहोचले. पेढे नेथील रवींद्र मोरे सराफ व्यावसायिक असून पानगल्ली नेथील खेराडे कॉप्लेक्स येथे त्यांचे दुकान आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तसेच सुधीर निवाते यांचा बाजारपेठेत चहाचा व्यवसाय आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow