हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान

Jun 28, 2024 - 12:31
 0
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. या मालिकेने हिना खानला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, हिना खानच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

हिना खानला कॅन्सरचं निदान झालं आहे. स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. याबाबत हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे.

३६ वर्षीय हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर

माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या चाहत्यांबरोबर मला एक बातमी शेअर करायची आहे. मला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. मी स्ट्राँग आहे आणि आजारातून बरी होणार आहे. यावर मी उपचार घेत असून यातून पूर्णपणे बरी होण्यासाठी मी सगळं काही करायला तयार आहे.

या काळात मला थोडी प्रायव्हसी हवी आहे. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि ताकदीची मला पूर्ण जाणीव आहे. या प्रवासातून जाताना मला तुमचे अनुभव आणि पाठिंब्याचा नक्कीच उपयोग होईल. मी माझ्या कुटुंबीयांबरोबर सकारात्मक राहीन. यातून मी पूर्णपणे बरी होईन याचा मला विश्वास आहे. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वादांची मला गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 28-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow