रत्नागिरीत उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

Jul 17, 2024 - 13:02
 0
रत्नागिरीत उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : जिल्ह्यातील आस्थापनांकडील पदांच्या भरतीसाठी रोजगार इच्छुक युवक व युवतींकरिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १८ जुलै रोजी कॅम्पस मुलाखतीप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नाचणे रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हा मेळावा होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, डिप्लोमा इंजिनिअर, पदवी इंजिनिअर, बी. एस्सी. व इतर पदवीधारक नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

मेळाव्याला येताना आधार कार्ड व शैक्षणिक पात्रतेची आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत. मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करताना काही समस्या असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:26 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow