'माई ह्युंदाई'च्या रत्नागिरी येथील शोरूमला चोवीस वर्ष पूर्ण; रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल..

Aug 31, 2024 - 15:20
 0
'माई ह्युंदाई'च्या रत्नागिरी येथील शोरूमला चोवीस वर्ष पूर्ण; रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल..

रत्नागिरी : माई ह्युंदाईची रत्नागिरी येथील शोरूम आज चोवीस वर्ष पूर्ण करून रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. 

सुरूवातीच्या काळात माई ह्युंदाईच्या कोल्हापूर येथील शोरूममधून डेमो कार्स आणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना टेस्ट ड्राइव्ह दिल्या जायच्या. आजच्यासारखा सोशल मीडिया त्यावेळी नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष गाडी बघून, चालवूनच ग्राहक कार खरेदीबाबतचे निर्णय घ्यायचे. व्यवसाय वृद्धिंगत होण्यास प्रचंड कष्ट, कल्पकता, उत्तम सेवा आणि आपल्या मनुष्यबळावर विश्वास लागतो, जो माई ह्युंदाईने मिळवला आहे. कोकणातील ग्राहक चोखंदळ. त्यामुळे कोणतीही वस्तू घेतांना सारासार विचार करून निर्णय घेण्याची सवय. ह्युंदाई कंपनी भारतात आल्यानंतर तर कार बाबत समाधानकारक माहिती देणं हे आव्हानात्मक होतं. ह्युंदाई आणि माई ह्युंदाईच्या व्यवस्थापनाने यासाठी प्रचंड मेहनत घेऊन सुविधा निर्माण केल्या, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं. त्यामुळे माई ह्युंदाई कोकणात घट्ट पाय रोवून उभी राहू शकली.  एका परदेशी कंपनीने वाहन उद्योगात भारतात पाऊल ठेवणे ही फारच मोठी गोष्ट होती. ह्युंदाईसारखी नवीन कंपनी भारतातील रस्त्यांचा, इथल्या वाहन उद्योगाचा, ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून भारतात आली. अगदी सुरवातीला भारतात ह्युंदाईने जे काही निवडक डीलर्स निवडले, त्यामध्ये कोल्हापुर मधील घाटगे ग्रुपचं नाव अग्रक्रमावर होतं. घाटगे ग्रुपचं ट्रान्स्पोर्ट, कुरिअर या व्यवसायातलं काम, ग्रुपची विश्वासार्हता यामुळे घाटगे ग्रुपकडे ह्युंदाईची डीलरशिप चालून आली.

गेल्या 24 वर्षात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना माई ह्युंदाईने उत्तम सर्व्हीस देऊन त्यांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं आहे. या कालावधीत अनेक असे ग्राहक माई ह्युंदाईबरोबर जोडले गेले, त्यांची पुढची पिढीही ह्युंदाई कार्स वापरू लागली. 

आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग  जिल्ह्यांसाठी स्वतंत्र डीलरशीप म्हणून माई ह्युंदाई, रत्नागिरीचे कामकाज चालते. 

आज चोवीस वर्ष पूर्ण होताना या वर्षांचा मागोवा घेतल्यास पुनःपुन्हा ह्युंदाईच्याच गाड्या अत्यंत समाधानाने विश्वासाने खात्रीलायकपणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची एक मोठी साखळीच दिसून येते. 

विक्री व विक्रीपश्चात सेवा तसेच ग्राहकांना देण्यात येणाऱ्या समाधानकारक सेवेबद्दल माई ह्युंदाईला या काळात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ह्युंदाई कार्सची क्वालिटी आणि उत्तम ग्राहक सेवा यामुळेच ग्राहक पुनःपुन्हा माई ह्युंदाईकडे येताहेत. या ग्राहकांना सेवा देण्यासाठी घाटगे ग्रुप सदैव कटिबद्ध आहे. माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांच्या नेतृत्वाखाली व डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली माई ह्युंदाईची यशस्वी वाटचाल सुरू आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये माई ह्युंदाईच्या ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, असं आवाहन तेज घाटगे यांनी केलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow