रत्नागिरी : परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश
रत्नागिरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी मंडळाच्या परीक्षा १६ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
दहावी परीक्षेसाठी फाटक हायस्कूल (रत्नागिरी), युनायटेड इंग्लिश स्कूल (चिपळूण), आल्फ्रेड गॅडने हायस्कूल (दापोली), राजापूर हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर १६ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. बारावीची उच्च माध्यमिक परीक्षा (कै.) पी. जी. अभ्यंकर आर्टस् व कॉमर्स कॉलेज (रत्नागिरी), डीबीजे कॉलेज (चिपळूण), वराडकर कला व बेलोसे वाणिज्य महाविद्यालय (दापोली) या परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी पारित केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 18-07-2024
What's Your Reaction?