आमदार शेखर निकम यांचा आजपासून गावभेट दौरा

Jul 18, 2024 - 09:58
 0
आमदार शेखर निकम यांचा आजपासून गावभेट दौरा

चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या गावभेट दौऱ्याच्या कार्यक्रमाला गुरुवार दि. १८ पासून सुरुवात होणार असून, चिपळूण तालुक्यात दि. १८ ते २० असा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 

आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी पक्षाची राजकीय ताकद वाढण्यासाठी आ. शेखर निकम यांनी १८ ते २० जुलै या कालावधीत चिपळूण तालुक्यातील जि. प. गटात गावभेट दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याची सुरुवात गुरुवारी सकाळी १० वा. परशुराम येथील श्री देव परशुराम मंदिरात देवदर्शनाने होणार आहे. परशुराम येथील बैठकीनंतर सकाळी ११:३० वा. पेढे, दु. १ वा. मजरेकाशी, दु. ३ वा. वालोपे, सायंकाळी ४:३० कळंबस्ते, सायंकाळी ६ वा. नवीन कोळकवाडी. त्यानंतर दि. २० जुलै रोजी सकाळी १० वा. धामेली, ११:३० वा. बिवली, १२:३० वा. मालदोली मोहल्ला, १:३० वा. मालदोली, ३ वा. करंबवणे, ४:३० वा. केतकी, ६ वा. भिले असे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी केले आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow