छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल

Jul 18, 2024 - 12:00
Jul 18, 2024 - 12:30
 0
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात दाखल झाली आहेत. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे आणली आहेत.

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. प्रतागडावर अफजलखानाचा वध करण्यासाठी या वाघनखांचा वापर करण्यात आला होता. मात्र काही इतिहास अभ्यासकांनी या वाघनखांवर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता दिलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच ही वाघनखे साताऱ्यात आणण्यात आली आहेत.

साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली आहे. त्यासाठी या संग्रहालयात स्वतंत्र कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. यानंतर सात महिने ही वाघनखे या संग्रहालयात नागरिकांना पाहता येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती अफझल खानला मारण्यासाठी वापरलेली वाघ नखेलंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत.  

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow