रत्नागिरी : जाकादेवीत घरावरील छत कोसळून ३० हजारांचे नुकसान

Jul 19, 2024 - 10:58
Jul 19, 2024 - 10:59
 0
रत्नागिरी : जाकादेवीत घरावरील छत कोसळून ३० हजारांचे नुकसान

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवासी असलेले सामान्य घराण्यातील शेतकरी प्रकाश सोनू आखाडे यांच्या मालकीचे घरावरील छत अतिवृष्टी व वादळी पावसाने सकाळी ६ वाजता पडले. यामध्ये शेतकरी प्रकाश सोनू आखाडे यांचे ३० हजारांचे नुकसान झाले. छतावरील कौले पडल्याने पावसाचे पाणी घरात गेले. त्यामुळे अन्नधान्य, कपड्यांचे नुकसान झाले. 

या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक देसाई, तलाठी परांजपे, ग्रामविकास अधिकारी शिगवण यांनी भेट देऊन पंचनामा केला. प्रकाश आखाडे यांची घरची आपत्कालीन परिस्थिती पाहून जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या आपदग्रस्त निधीतून प्रकाश आखाडे यांच्या कुटुंबीयांना जाकादेवी विद्यालयातर्फे ५ हजारांची आपत्कालीन तातडीची रोख मदत देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, ज्येष्ठ शिक्षक संतोष पवार, क्रीडाशिक्षक संतोष सनगरे, सहाय्यक शिक्षक मंदार रसाळ आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow