शेर खामोश है... इसका मतलब ऐसा नही... की जंगल तुम्हारा हो गया.....! ; पालकमंत्र्यांच्या शायरीने विरोधकांवर चपराक

Jul 19, 2024 - 13:07
 0
शेर खामोश है... इसका मतलब ऐसा नही... की जंगल तुम्हारा हो गया.....! ;  पालकमंत्र्यांच्या शायरीने विरोधकांवर चपराक

◼️ माझ्या शांत स्वभावाचा गैर फायदा घेऊ नका : ना. उदय सामंत

रत्नागिरी : शेर खामोश है... इसका मतलब ऐसा नही... की जंगल तुम्हारा हो गया.....! ही शायरी कोणत्या शायर ने नाही तर राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी - रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज आपल्या शेरो शाहिरीने उपस्थितांची मने जिंकत विरोधकांचा चांगलाच धुव्वा उडवला आहे. त्यांच्या शायरीने चांगलीच विरोधकांना चपराक दिली आहे.
             

पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभेचे गेली चार टर्म म्हणजे २० वर्ष तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी असल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिला आहे आणि महाराष्ट्र या गोष्टीचा साक्षीदार  आहे. या पूर्ण वीस वर्षांमध्ये रत्नागिरी करांची सेवा करणे हाच ध्यास धरून पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या विकासाला चालना दिले. आज रत्नागिरीचे नाव वेगळ्या पातळीवरती नेऊन ठेवण्याचे  काम त्यांनी केले आहे. अनेक विरोधक उदय सामंत यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतात मात्र उदय सामंत यांनी कधीही कुठल्याही विरोधकांना त्यांच्या टिकेला उत्तर दिले नाही किंवा त्यांना अपशब्द वापरला नाही. मात्र निवडणुका जवळ आल्या ही काही बेडके डराव डराव करायला लागतात त्या पद्धतीची परिस्थिती आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते. आणि म्हणून माझ्या शांत स्वभावाचा गैर फायदा कोणीच घेऊ नये, असा इशारच या शायरीतुन मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिला आहे.
           

राजकारणात काम करत असताना मी कधीही वैयक्तिक पातळीवर जाऊन कोणावर टीका किंवा वैयक्तिक पद्धतीचे राजकारण माझ्या उभ्या आयुष्यात केले नाही. मात्र हे त्रिकाल सत्य आहे आणि ज्यांना मदत केली ज्यांच्या पाठीमागे उभे राहिलो तेच आज माझ्या नावाने बोंबा मारत सुटले आहेत. स्वार्थी माणसांना मी कधीही उत्तर देणार नाही मात्र त्यांनीही माझ्यावर जरी किती टीका केली तर त्यांना देव कधीही माफ करणार नसल्याचा सल्ला यावेळी विरोधकांना दिला आहे. आज रत्नागिरीकरांची मी सेवा करत आहे. त्यामुळे त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि यापुढे देतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केला. ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती टीका केली त्यांना मी विकासाच्या माध्यमातून उत्तर दिला म्हणून आज रत्नागिरीकर माझ्यासोबत असल्याचा मला अभिमान आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही. मी सामाजिक आणि धर्मनिरपेक्ष काम करत राहिलो आणि यापुढेही करत राहील. रत्नागिरी तालुक्यातील जनता जोपर्यंत माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नसल्याचा सल्ला मंत्री उदय सामंत आणि विरोधकांना दिला आहे. त्यांच्या शेरोशायरी मुळे आता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच रंगत पाहायला मिळणार आहे हे मात्र निश्चित.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:34 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow