khed ; देवणे पुलानजीकच्या बाजूपट्ट्या गेल्या वाहून

Jul 22, 2024 - 10:03
Jul 22, 2024 - 17:24
 0
khed ; देवणे पुलानजीकच्या बाजूपट्ट्या गेल्या वाहून

खेड : खाडीपट्ट्यासह शहराला जोडणारा देवणे पूल वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याने मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते; मात्र चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत या मार्गाच्या दोन्ही बाजूपट्ट्या वाहून गेल्या असून, भरावही खचला आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बाजूपट्ट्या वाहून गेल्याचा आरोप होत आहे. खाडीपट्ट्यातील देवणे पुलाची उभारणी झाल्यापासून हा पूल नेहमीच चर्चेत राहिला आहे. पुलाचे काम सुरू झाल्यानंतर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. कामाचा दर्जाच न राखल्याने प्रत्येक पावसात पुलावरील वाहतूक जिकिरीची होते. सातत्याने अपघातदेखील होतात. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow