शिक्षा सप्ताह : शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव-सांस्कृतिक दिन - स्वा. सावरकर नाट्यगृहात उद्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Jul 24, 2024 - 17:22
 0
शिक्षा सप्ताह : शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव-सांस्कृतिक दिन - स्वा. सावरकर नाट्यगृहात उद्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या ४थ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या शिक्षण सप्ताह कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार आहे. शिक्षा सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे.

शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे २५ जुलै २०२४ रोजी आपल्या रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम विशेष रूपाने साजरा केला जाणार आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, गायन, नाट्य, कथाकथन, लोकनृत्य, लोककला प्रदर्शन आणि पथनाट्य असा वैविध्यपूर्ण असणार आहे.

दिनांक २५ जुलै २०२४, गुरुवार रोजी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन सकाळी ११ वाजता श्री. उदय सामंत, उ‌द्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी-रायगड जिल्हा यांच्या शुभहस्ते होणार आहे. जिल्हा परिषद, रत्नागिरी. पंचायत समिती, रत्नागिरी आणि प्रशासन अधिकारी तसेच सर्व अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कला अविष्कारांना संधी देण्याचा शासनाकडून होत असलेला विशेष प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. शिक्षण सप्ताहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास पूर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच अन्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी व दामले विद्यालयाचे मुख्याध्यापिका यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow