दापोली : कर्दे येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान

Jul 22, 2024 - 16:30
Jul 22, 2024 - 16:33
 0
दापोली : कर्दे येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान

दापोली : दापोली तालुक्यातील कर्दे ग्रामपंचायत हद्दीत घराला आग लागून घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत घर खाक झाले. 

कर्दे येथील खैऱ्याचा कोंड येथील जनार्दन पेवेकर यांचे मालकीचे हे कौलारू घर होते. दि. २० जुलै रोजी ३ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी खेड येथील अग्निशमन दलाचा बंब सायंकाळी ५ वाजता घटनास्थळी आग विझविण्यासाठी गेला. मात्र, त्या आधीच घराची राख झाली होती. दापोली महसूल विभागाचे तलाठी आणि अन्य कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow