गुहागरमधून वॅगनआर गाडीची चोरी

May 31, 2024 - 10:57
 0
गुहागरमधून वॅगनआर गाडीची चोरी

गुहागर : तालुक्यातील वरचापाट मोहल्ला येथून इब्राहिम माहीमकर यांच्या मालकीची वॅगनआर कार (क्रमांक एमएच ०५ एबी ५४७५) त्यांच्या घराजवळ उभी असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या गाडीची किंमत ७० हजार रुपये असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले आहे. हा प्रकार २६ रोजी रात्री ११.२० ते दि. २७ रोजी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी दि. २९ रोजी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 31-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow