रत्नागिरी : शिंदे गट शिवसेनेच्या दणक्यानंतर 'खड्डे भरणी ला' प्रारंभ

Jul 25, 2024 - 10:33
 0
रत्नागिरी : शिंदे गट शिवसेनेच्या दणक्यानंतर 'खड्डे भरणी ला' प्रारंभ

◼️ डबर ऐवजी काँक्रीटच्या सहाय्याने खड्डे भरले जाणार 

रत्नागिरी : खड्ड्यांमुळे त्रस्त वाहनचालकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गट शिवसेनेच्या दणक्यानंतर आता नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. 

काल रत्नागिरी नगरपालिकेवर शिंदे गटाच्या माजी नगरसेवक आणि शिवसैनिकांनी धडक देत रत्नागिरीत पडलेल्या खड्डयां बाबत जाब विचारला. रत्नागिरीकरांचे या खड्डयांमुळे कंबडे मोडले असून नगर पालिका फक्त मलमपट्टी करण्याचे काम करत आहे. डबर खतल्यानंतर चिखल होऊन तो चिखल चालत जाण्याऱ्या लहान मुलांच्या, वयोरुद्धाच्या, आणि मोटरसायलकल चालकांच्या अंगावर उडतो त्याचा ही त्रास होऊ लागला आहे. आता डबर नको तर काँक्रिटनेस रस्त्याचे खड्डे बुजवली गेले पाहिजेत, अशी मागणी माजी नगरसेवकानी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याजवळ केली. जनतेचा प्रश्न तो आमचा प्रश्न त्यामुळे तात्काळ कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. त्यावर उद्यापासून तात्काळ कारवाई केली जाईल असा शब्द मुख्याधिकारी यांनी दिला होता.

रत्नागिरी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे आज सकाळ पासून नगरपालिकेची पूर्ण टीम त्यांचे इंजिनियर कर्मचारी जातीनीशी रस्तावर उतरून टाकलेला डबर काडून त्यात काँक्रीट टाकून रस्त्यावरील खड्डे भरण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नगरपालिकेने सुरु केलेल्या कामाचे शिंदे गटाच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून उत्तम दर्जाचे काम रत्नागिरीतील खड्डे भरण्यासाठी करा अशी ही मागणी यावेळी केली आहे. शिंदे गटाच्या या धडक मोर्चा नंतर आता खड्डे भरणीला सुरुवात झाल्याचे पहावयास मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow