रत्नागिरी : शिवार आंबेरे-जाकादेवी फाटा येथे दारूच्या नशेत एकावर सुऱ्याने वार

Jul 25, 2024 - 10:29
 0
रत्नागिरी : शिवार आंबेरे-जाकादेवी फाटा येथे दारूच्या नशेत एकावर सुऱ्याने वार

रत्नागिरी : तालुक्यातील शिवार-आंबेरे-जाकादेवी फाटा येथे दारुच्या नशेत एकाने प्रौढाला शिवीगाळ करत सुऱ्याने वार केला. ही घटना मंगळवार २३ जुलै रोजी दुपारी २.३० वा. सुमारास घडली. 

विलास गोपाळ कांबळी (रा. शिवार आंबेरे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात योगेश दिनकर तिवरेकर (४०, रा. रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी योगेश तिवरेकर हे शिवार आंबेरे-जाकादेवी फाटा येथे चायनिज गाळा सुरु करण्यासाठी त्यांचे मित्र सुनील लाखण सोबत बोलत होते. तेव्हा संशयित विलास कांबळी दारू पिऊन तिथे आला. त्यानंतर त्याने फिर्यादिला शिवागाळ करत त्याच्याजळील सुऱ्याने फिर्यादीच्या उजव्या गालावर वार करून दुखापत केली. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow