देवरूखातील शासकीय विश्रामगृह इमारतीवर कोसळले झाड

Jul 25, 2024 - 11:06
 0
देवरूखातील शासकीय विश्रामगृह इमारतीवर कोसळले झाड

साडवली : मुसळधार व वादळी पावसामुळे देवरूखातील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवर परिसरात असलेले आंब्याचे झाड कोसळले आहे. ही घटना बुधवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी इमारतीत व या झाडाजवळ कोणी नसल्याने अनर्थ टळला.

या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोयती, कटरच्या सहाय्याने झाड बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी उशिरा हे झाड इमारतीवरून बाजूला करण्यात आले. या ठिकाणी अशी आणखी काही उंच व विस्तारलेली वृक्ष आहेत. ती वादळी पावसात येथील इमारतीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देवरुख परिसरात अनेक ठिकाणी कोसळण्या बरोबर विद्युत वाहिन्या तुटुन विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow