Ratnagiri : मुसळधार पावसाने जिल्ह्यात दहा कोटींचे नुकसान

Jul 25, 2024 - 10:59
 0
Ratnagiri : मुसळधार पावसाने जिल्ह्यात दहा कोटींचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जूनपासून सरासरी २२०० मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने २० हजार मि.मी. एकूण ६४ टक्के मजल गाठली आहे. गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने आतापर्यंत १० कोटीहून जास्त रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे.

यामध्ये घरे, दुकानांना सर्वाधिक फटका बसला असून ८२ गावांतील ७३५ शेतकऱ्यांच्या १८८ हेक्टर क्षेत्रात कृषी हानी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दरडी आणि पुरा धोका असलेल्या ७७ कुटुंबे आणि ३१८ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात एकूण अडीच हजार मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. मात्र, सोमवारसह मंगळवारीही पावसाचा जोर ओसरलेला होता. या कालावधीत जिल्ह्यातील ८ प्रमुख नद्यांपैकी चार नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत होत्या. मुसळधार पावसामुळे घरे, गोठे आणि मालमत्तांचे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

यामध्ये कच्च्या घरांचे १ कोटी ४४ लाख ७६,१६१ पक्क्या २२५ घरांचे अंदाजे ८४ लाख ४५,४२०, ७१ गोठ्यांचे २४ लाख ९९,८०१, ६२ सार्वजनिक मालमत्तांचे ५२ लाख ५५,९५०, ४६ खासगी मालमत्तांचे ३४ लाख २२ हजार १३२ रुपयांचे नुकसान झाले. वित्त हानीमध्ये ५३४ दुकांना मुसळधार पावसाचा फटका बसला यामध्ये ७ कोटी ८ लाख ८६,६५५ रुपयांची हानी झाली. जोरदार पावसाने उद्भवलेल्या पूरस्थितीने १२ जनावरे दगावली. यामध्ये कृषी उपयुक्त जनावरे दगावल्याने ३ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. जोरदार पावसाने जगबुडी आणि वाशिष्ठी नदीचा जलस्तर वाढल्याने उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यात एकूण ७७ कुटुंबातील ३१८ ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये खेड तालुक्यातील ४९ कुटुंबातील २०८ व्यक्ती, चिपळूण तालुक्यातील २४ कुटुंबातील ९९ व्यक्ती आणि गुहागर तालुक्यातील ४ कुटुंबातील ११ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सतर्क
जिह्यात सर्व विभागांमधील आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरू कार्यरत ठेवून सतर्कता बाळगण्यात आली. त्यामुळे घडलेल्या घटनेसंदर्भात वेळेत माहिती मिळून मदत पोहोचवणे शक्य झाले. महामार्गावर दर ४० ते ५० किलोमीटर अंतरावर आपत्ती संदर्भातील यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली. प्रत्येक धरणांची डागडुजी आणि दुर्घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या. कमी पावसाच्या वेळांचा अंदाज घेऊन धरणांचे विसर्ग सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूरप्रवण आणि दरडप्रवण क्षेत्रात वेळोवेळी पावसासंदर्भातील सूचना देऊन सतर्कता बाळगण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow