चिपळुणात 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला थांबा मिळावा : आमदार शेखर निकम

Jul 25, 2024 - 11:42
Jul 25, 2024 - 13:45
 0
चिपळुणात 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला थांबा मिळावा : आमदार शेखर निकम

चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी निवेदनाद्वारे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वदे भारत एक्स्प्रेस गाडीला चिपळूण रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी प्रवाशांमधून जोरदार मागणी होत आहे. मात्र, अजूनही या गाडीला चिपळूणमध्ये थांबा मिळालेला नाही. या विषयात आमदार शेखर निकम यांनी लक्ष घातले असून कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना नुकतेच निवेदन दिले. यानुसार रेल्वे प्रशासनाने इतर मेल व एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात १०० कि.मी. च्या आत थांबे दिले आहेत. वंदे भारत या गाडीला खेड येथे थांबा दिला आहे. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे कौतुक करतो. परंतु चिपळूण येथे वंदे भारत गाडीला थांबा देण्यात आला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चिपळूण शहरालगत असणाऱ्या विविध औद्योगिक कंपन्यांमुळे व पर्यटन क्षेत्रामुळे चिपळूण रेल्वे स्थानक हे व्यापार, उद्योग व पर्यटनासाठी एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. वंदे भारत या गाडीला चिपळूणसारख्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर थांबा न देणे म्हणजे कोकणाच्या विकासाला खिळ घालणे समान आहे. या बाबींचा विचार करून पर्यटन, व्यापार व उद्योग वाढीच्या व प्रवासाच्या दृष्टीने वंदे भारत एक्स्प्रेसला चिपळूण थांबा देण्यात यावा, अशी मागणी निकम यांनी केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow