चिपळूण : श्रीदेव जुना कालभैरवची उद्या किरका मिरवणूक

Jul 25, 2024 - 17:17
 0
चिपळूण : श्रीदेव जुना कालभैरवची उद्या किरका मिरवणूक

चिपळूण : चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूणच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे वार्षिक किरका (जत्रा) मिरवणूक शुक्रवार दि. २६ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीत चिपळूण शहराच्या चतुः सीमेत सवाद्य फिरणार आहे.

श्री ग्रामदैवत जुना कालभैरव मंदिरात दुपारी २:१५ वाजता किरकेचा मांड भरणे धार्मिक विधी होईल. या नंतर मंदिरातून दुपारी ३ वाजता किरका मिरवणूक सवाद्य निघून चिपळूण शहराच्या चतुःसीमेत फिरल्यानंतर सायंकाळी ६ च्या दरम्यान श्री दत्त मंदिर खेर्डी समोर सांगता होईल. याची नोंद घेऊन देवस्थानचे समस्त मानकरी, सेवेकरी, भैरवसेवक कार्यकर्ते आणि भक्तगण नागरिक यांनी सहभागी व्हावे. श्री जुना काळभैरव देवस्थान संबंधीत अशा चिपळूण शहरातील पारंपारिक मंदिरे, देवस्थाने, दर्गे, पीर आदींच्या गुरव, पुजारी, मुल्लाजी यांनी आपल्या देवस्थानचा, मंदिराचा, दर्याचा, पीराचा नैवेद्य शिधा गुरुवार दि. २५ जुलै रोजी सकाळी १० ते १ या वेळेत श्री ग्रामदैवत जुना काळभैरव मंदिरातून स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:45 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow