रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Jul 16, 2024 - 10:45
 0
रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

त्नागिरी : पाच कोटी ९८ लाख ८३ हजार रुपयांच्या निधीमधून सुसज्ज करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन सभागृहाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून आणि फित कापून सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, अधीक्षक अभियंता छाया नाईक आदी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीमधून ३ कोटी ६३ लाख ८४ हजार व विद्युत खर्चासाठी २ कोटी ३४ लाख ९९ हजार असे एकूण ५ कोटी ९८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी या सभागृहासाठी देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow