रत्नागिरी विमानतळ टर्मिनल बिल्डींग शुभारंभासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत येणार

Jul 25, 2024 - 17:04
 0
रत्नागिरी विमानतळ टर्मिनल बिल्डींग शुभारंभासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत येणार

रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी समोर येत आहे. प्रवासी वाहतुकीस आवश्यक असणाऱ्या टर्मिनल बिल्डींगचे १०० कोटी रुपयाचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

या कामाचे भूमिपूजन येत्या काही दिवसातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी दिली आहे. सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमिनतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे विमानतळ दाखल होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow