मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र ६ चा निकाल ४९.३१ टक्के

May 31, 2024 - 15:06
 0
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र ६ चा निकाल ४९.३१ टक्के

मुंबई : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीए सत्र ६ या महत्वाच्या परीक्षेचा निकाल काल रात्री जाहीर केला आहे.

या परीक्षेत ४,६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ४९.३१ एवढी आहे. विद्यापीठाने वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेच्या निकालाबरोबरच मानव्य विद्याशाखेचा निकालही ३० दिवसाच्या आत जाहीर केला आहे.

या परीक्षेत १३,३०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १२,६९७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये ४,६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४८०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ४९.३१ टक्के एवढा लागला आहे. ६०४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. ४५ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर २२४३ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने ९२८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्राचे ७४ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 31-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow