खेड : राज्याला हेवा वाटेल असे सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभे करु : आ. योगेश कदम

Jul 27, 2024 - 11:14
Jul 27, 2024 - 15:23
 0
खेड : राज्याला हेवा वाटेल असे सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभे करु : आ. योगेश कदम

खेड : संपूर्ण राज्याला हेवा वाटेल, असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र स्व. मीनाताई ठाकरे यांच्या नावाने खेडमध्ये पुन्हा उभे रहात आहे, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी येथे केले. बुधवार दि. २४ रोजी त्यांनी शहरातील सांस्कृतिक केंद्राच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शहरात शिवसेनेच्या सत्ता काळात पालिकेमार्फत उभारण्यात आलेले स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नादुरुस्त होऊन गेले अनेक वर्षे बंद होते. 

या सांस्कृतिक केंद्राचे गेल्या सहा महिन्यांमध्ये वेगाने दुरुस्ती व कायापालट करण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी आ. योगेश कदम यांनी आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला असून आगामी कालावधीत त्याचे संपूर्ण रूप पालटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. बुधवारी दि. २४ रोजी सायंकाळी आ. कदम यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत मुख्याधिकारी महादेव रोडगे, पालिकेचे अधिकारी नागेश बोंडले, संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेवक सतीश चिकणे, पांडुरंग माने, संपदा गुजराथी आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. कदम म्हणाले की, या सांस्कृतिक केंद्राची उभारणी शिवसेनेच्या कार्यकाळात झाली. मात्र, ते ना दुरुस्त झाल्यानंतर मध्यंतरी विरोधकांना ते दुरुस्तदेखील करता आले नाही. या केंद्राच्या नावाखाली निवडणुका लढल्याचे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow