रत्नागिरीतील एका कंपनीकडून सिंधुदुर्गात २.२५ कोटींची फसवणूक

May 28, 2024 - 12:22
May 28, 2024 - 12:22
 0
रत्नागिरीतील एका कंपनीकडून सिंधुदुर्गात २.२५ कोटींची फसवणूक

कुडाळ : रत्नागिरी येथील एका जॉब वकर्सच्या नावाखाली प्रस्थापित झालेल्या प्रा. लि. कंपनीच्या विरोधात सिंधुदूर्गातील ७८ जणांनी आपली २.२५ कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांत दाखल केला आहे.

ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील असून जॉब वकर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. यावेळी ७८ जणांनी एकत्र येत आपल्या फसवणूकीची तक्रार कुडाळ पोलिसांकडे दिली आहे. त्यावर ७८ जणांची नावे व त्यासमोर आपण जमा केलेली रक्कम टाकण्यात आल्याचे समजते. यामध्ये २५ हजारांपासून १ लाख ७५ हजारांपर्यंतची रक्कम नमुद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची ही ७८ जणांची रक्कम आहे.

दरम्यान, फसवणूक झालेल्यांचा आकडा अजुनही मोठा असून रक्कमही त्याच पटीत वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत कुडाळ पोलिसांत रितसर तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या फसवणुकीत अनेक जनसामान्यांना गंडा बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तकार दारांच्या अर्जाची दखल घेऊन फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 28-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow