Ganesh Chaturthi 2024 : कोकणात चार लाखांहून अधिक चाकरमानी दाखल

Sep 9, 2024 - 10:44
 0
Ganesh Chaturthi 2024 : कोकणात चार लाखांहून अधिक चाकरमानी दाखल

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची वर्दळ सर्वत्र दिसत आहे. ग्रामीण भागात लालपरीबरोबरच ट्रेनमधून आलेले चाकरमानीही इतर वाहनांनी आपल्या नियोजित स्थळी पोहोचताना दिसत आहेत.

मागील चार दिवसांत कोकणात जवळपास साडेचार हजार एसटी बसेस दाखल झाल्या असून, त्यातून अडीच लाख चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पोहोचले आहेत. ट्रेन, खासगी बसेस, चारचाकीमधून येणार्‍या प्रवाशांमुळे जवळपास चार लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास दीड-दोन लाख चाकरमानी दाखल झाले आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठा गणेशोत्सव असतो. अगदी रायगडही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या तीन जिल्ह्यांत मुंबई, उपनगर, ठाणे, नालासोपारा, वसई, पुणे येथून तब्बल साडेचार हजारहून अधिक बसेसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. गणरायाच्या तयारीसाठी अनेक चाकरमानी दोन-तीन दिवस आधीच गावी येत असल्याने, त्याद़ृष्टीने एसटी महामंडळाने नियोजन केले होते. 4 सप्टेंबरला 600 गाड्या कोकणात दाखल झाल्या.

5 सप्टेंबरला सर्वाधिक म्हणजे 3 हजार गाड्या कोकणात आल्या. यावेळी ट्रॅफिक जॅमचा मोठा फटकाही चाकरमान्यांना बसला. 6 सप्टेंबरला एक हजार गाड्या दाखल झाल्या. यातून जवळपास अडीच लाखाहून अधिक चाकरमानी तीन जिल्ह्यात आले. रेल्वे, खासगी बसेस, चारचाकी गाड्या घेऊन येणार्‍या चाकरमान्यांची संख्या वेगळी आहे. त्यामुळे जवळपास चार ते पाच लाखाहून अधिक चाकरमानी तीनही जिल्ह्यात दाखल होतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 09-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow