भाजपाची ताकद वाढल्याने तयारी करा : मंत्री रवींद्र चव्हाण

Jul 29, 2024 - 12:36
 0
भाजपाची ताकद वाढल्याने तयारी करा : मंत्री रवींद्र चव्हाण

रत्नागिरी : देवेंद्र फडणवीस २०१९ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार होते. परंतु विरोधकांनी सहा महिने आधी फेक नरेटिव्ह सेट करायला सुरूवात केली. अशी वेळ २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा येणार नाही, याकरिता फेक नरेटिव्हना कार्यकर्ताच घरोघरी जाऊन उत्तर देणार आहे. विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची गरज असते. तेवढे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते काय घ्यायचा तो निर्णय घेतील. पण आपण तयारी करूया. कोकणात भाजपाची ताकद लोकसभा व कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आली आहे, अशा सूचना भाजपा नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा बैठकीत दिल्या.

स्वयंवर मंगल कार्यालयात ही बैठक झाली. मंत्री चव्हाण म्हणाले की, कोकणात आता सणांचे दिवस सुरू होतील. परंतु सण साजरे करताना देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद मिळतील असे कार्यक्रम घ्या. प्रत्येक कार्यकत्यनि पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरवात करा. लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही, असे जे बोलत होते. तेच लोक आता भाजपची ताकद चांगलीच आहे, असे बोलू लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच महाराष्ट्रातील २८ हजार गावे जलयुक्त झाली, मुंबईत मेट्रो धावू लागली. भारतात ११० कोटी लोकांना काही ना काही योजना मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दिली आहे. भुयारी मेट्रोसाठी विरोध झाला. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मग यांना माहिती मिळाली की आपली घरे जाणार नाही. मग मान्यता मिळाली, पण विरोधक उगाचच विरोध करून खिसे भरण्याचे काम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बाळ माने, राजेश सावंत यांना सरावाचा सल्ला
याप्रसंगी कबड्डीमधील गोष्ट सांगताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार बाळ माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना आता पूर्वीसारखा सराव चालू करा, अशा कोपरखळ्या मारल्या. मंत्री चव्हाण म्हणाले, कबड्डीच्या मैदानात काय होतं, चांगले ताकदीचे खेळाडू उतरले, चांगली चढाई करणारे, दिसायला लागले, धावायला लागले की समोरचा संघ म्हणतो आज अ टीम उतरवलेली दिसतेय. समोरचा वयाने थकलेला असेल तर सामन्याला बाय घेतली जाते. माने, असं होऊ शकतं. राजेश सावंत पूर्वीसारखा सराव सुरू करा. कधीही फिट राहिले पाहिजे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow