रत्नागिरी : महसूल सप्ताहाचे १ ऑगस्टपासून आयोजन

Jul 29, 2024 - 12:35
 0
रत्नागिरी : महसूल सप्ताहाचे १ ऑगस्टपासून आयोजन

त्नागिरी : येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या सूचना पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणाची चौकशी करणे इत्यादी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या तसेच महसुली वसुलीचे उदिद्ष्ट पार करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता १ ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.

यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहनिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात येणार आहेत.

१ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, २ ऑगस्ट - मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ३ ऑगस्ट - मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, ४ ऑगस्ट - स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, ५ ऑगस्ट - सैनिक हो तुमच्यासाठी, ६6 ऑगस्ट- एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा आणि ७ ऑगस्ट - महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल सप्ताह सांगता.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow