रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी

Jul 29, 2024 - 17:25
 0
रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी

रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून तरुणांना जिल्हा परिषदेत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अर्हतेप्रमाणे बारावी, आयटीआय/पदविका आणि पदवीधर/पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना ६ ते १० हजार रुपयांचे विद्यावेतन शासनाकडून दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे.

या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. उपलब्ध पदांचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक प्रशिक्षणार्थी संख्या अशी आहे - विस्तार अधिकारी (सां), विज्ञान/कृषी/वाणिज्य/अर्थशास्त्र किंवा गणित विषयासह पदवीधर-१, वरिष्ठ सहाय्य्क (लिपीक) कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमएससीआयटी - २, वरिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमएससीआयटी -२, कनिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी टंकलेखक-३०, इंग्रजी टंकलेखन-४० एमएससीआयटी - १२, वाहनचालक बारावी किंवा पदवीधर, जड वाहन चालविण्याचा परवाना- २, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदवीधर, लेखाशास्त्र, वाणिज्यशास्त्र, वाणिज्य शाखा, एमएससीआयटी -१, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) बारावी किंवा पदवीधर, मराठी टंकलेखन ३०, एमएससीआयटी-१, ग्रामसेवक बारावी परीक्षा ६० टक्क्यांनी उत्तीर्ण, कृषी पदवीका/पदवीधर, अभियांत्रिका पदविका, बीएसडब्लू, एमएससीआयटी -३२, विस्तार अधिकारी (कृषी) कृषी विषयातील पदवीधर -१, पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी/पदविका, एमएससीआयटी -३, पर्यवेक्षका पदवीधर(समाजशास्त्र/गृहविज्ञान) एमएसडब्लू -२, मिश्रक/औषध निर्माण अधिकारी औषध निर्माणशास्त्रातील पदवी/पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार-३, आरोग्य सेवक (पुरुष) बारावी/पदवी (दहावी विज्ञान विषयासह उत्तीर्ण)-१०, आरोग्य सेविका (महिला) ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचारिका परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचारिका परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील - २४, कनिष्ठ अभियंता (बांधकाम) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयासह पदवी/पदविका-३, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी/पदविका/पदव्युत्तर पदवी -१, प्राथमिक शिक्षक बारावी उत्तीर्ण, डीएड व टीएटी परीक्षा उत्तीर्ण - ३७०, परिचर बारावी पास -२७, स्त्री परिचर बारावी पास -३, सफाई कामगार -बारावी पास -३, चौकीदार - बारावी पास -१.

इच्छुक उमेदवारांनी https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी. (संपर्क क्र. 02352-299385) यांच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow