'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'चा राजापूरमध्ये शुभारंभ

Jul 18, 2024 - 13:05
 0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'चा राजापूरमध्ये शुभारंभ

राजापूर : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'चा राजापूर तालुक्यामध्ये शुभारंभ सोहळा राजापूर नगर परिषद नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य श्री. किरण उर्फ भैय्या शेठ सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हावळे, राजापूरच्या प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने, राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शितल जाधव, गटविकास अधिकारी श्री जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, तालुका प्रमुख दिपक नागले, राजापूर शहर प्रमुख सौरभ खडपे, महिला शहर प्रमुक हर्षदा खानविलकर, युवा सेना तालुका प्रमुख सुनिल गुरव, महिला सघटक सिद्धी शिरसेकर, पाचल विभाग प्रमुख शैलेश साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले, तसेच उत्पन्नाच्या दाखल्यांचे देखील वितरण करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:34 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow