कोकणातील धरणांमधील जलसाठा अव्वल

Jul 30, 2024 - 15:33
Jul 30, 2024 - 15:34
 0
कोकणातील धरणांमधील जलसाठा अव्वल

रत्नागिरी : राज्यातील सर्व धरणांत मिळून ६७६. ६६ टीएमसी पाणीसाठा झाला. कोकण विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १३०.८४ आहे. आता धरणांमध्ये १००.७३ टीएमसी म्हणजे ७६.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या पाच दिवसांत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात १०.३८ टक्के, म्हणजेच २४८.७१ टीएमसी वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पांमधील पाणीसाठा ४७.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. 

राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा ६७६.६६ टीएमसी झाला. जूननंतर जुलैमधे सरासरी पावसापेक्षा ११ टक्के अतिरिक्त पाऊस झाल्याने कोकणातील धरणातील जलसाठा अन्य विभागाच्या तुलनेत अव्वल झाला आहे. 

यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला होता. तसेच मोसमी पाऊस विलंबाने सक्रीय झाल्याने धरणे कधी भरणार, याकडे लक्ष लागले आहे. धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४३०.६३ टीएमसी आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ६७६.६६ टीएमसी पाणीसाठा झाला. कोकण विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १३०.८४ टीएमसी आहे. आता धरणांमध्ये १००.७३ टीएमसी (७६.९७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता ५३७.२८ टीएमसी आहे. आता होत असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा २९७.८१ टीएमसीबर (५५.४४ टक्के) पोहोचाला आहे. नाशिक विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता २०९.६१ टीएमसी आहे. धरणात ७७.१७ टीएमसी (३७.०६ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाडा विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता २५६.४५ टीएमसी आहे. धरणांत ३४.०५ टीएमसी (१३.२७ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

अमरावती विभागातील धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १३६.७५ टीएमसी आहे. धरणांत ६४.६६ टीएमसी (४८.४१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १६२.७० टीएमसी आहे. धरणांत १०१.७० टीएमसी (६२.५१ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow