रत्नागिरी : गोगटे वनस्पतीशास्त्रच्या विद्यार्थ्यांची रनपारमधील खारफुटी क्षेत्रभेट

Jul 31, 2024 - 10:15
Jul 31, 2024 - 14:59
 0
रत्नागिरी : गोगटे  वनस्पतीशास्त्रच्या विद्यार्थ्यांची  रनपारमधील खारफुटी क्षेत्रभेट

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. रनपार येथे विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचा कार्यक्रम झाला. या दरम्यान, विद्यार्थ्यांना रनपार येथील खारफुटी परिसंस्था पाहणे व त्याच्या संवर्धनाची गरज समजून घेणे, हा हेतू होता. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रायझोफोरा म्युक्रोनाटा, रायझोफोरा अपेटला, लुमनित्झेरा, अविसेनिया, एजिसेरास, सेरियोप्स, अकॅथस इ. खारफुटीच्या प्रजाती तसेच खारफुटीच्या सहयोगी वनस्पती यांचे निरीक्षण केले तसेच तेथे असणाऱ्या खारफुटी वनस्पती त्यांचे त्या परिसंस्थेतील महत्त्व आणि खारफुटीच्या तोडीमुळे तेथे उद्भवणाऱ्या समस्या याबद्दल जाणून घेतले. 

डॉ. विराज चाबके आणि प्रा. ऋजुता गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना खारफुटींच्या प्रजाती व तेथील प्राणी, पक्षी याबद्दल मार्गदर्शन केले. द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे हे सहभागी झाले. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow