रत्नागिरी : धन्वंतरी धर्मादाय संस्थेचा दुसरा वर्धापन दिन गुरुवारी

Jul 31, 2024 - 10:49
Jul 31, 2024 - 14:49
 0
रत्नागिरी : धन्वंतरी धर्मादाय संस्थेचा दुसरा वर्धापन दिन गुरुवारी

त्नागिरी : येथील सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या धन्वंतरी धर्मादाय संस्थेचा दुसरा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) होणार आहे.

धन्वंतरी धर्मादाय संस्था संचालित रक्तसाठवणूक केंद्र तृतीय सेवा वर्षात पदार्पण करत आहे.

हा कालावधी मोठा नसला, तरी संस्था तृतीय वर्षात अधिक आत्मविश्वासाने पाऊल ठेवत आहे. यानिमित्ताने रक्तदान शिबीरांचे आयोजन करणाऱ्या विविध सामाजिक संस्था तसेच पत्रकार बंधू, भगिनी, हितचिंतक यांच्या स्नेहमीलनाचा कार्यक्रम येत्या गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डॉ. संघमित्रा फुले, डॉ. अलिमिया परकार, डॉ. मतीन परकार, अन्न औषध प्रशासन अधिकारी श्री., डॉ. श्रीविजय फडके, डॉ. ज्योत्स्ना देशपांडे, डॉ. अरुण डिंगणकर, वैभवीलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक अनमोल कामत उपस्थित राहणार आहेत.

पऱ्याच्या आळीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9511704655 या क्रमांकाव संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow