रत्नागिरी : रास्त भाव धान्य दुकानात ऑफलाईन धान्य वितरण

Aug 1, 2024 - 09:45
Aug 1, 2024 - 09:48
 0
रत्नागिरी : रास्त भाव धान्य दुकानात ऑफलाईन धान्य वितरण

रत्नागिरी : राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रास्तभाव दुकानांमध्ये 4G तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत.

राज्यात कांही दिवसापासून रास्तभाव दुकानामधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी असल्याने सर्व्हर समस्येमुळे राज्यातील रास्तभाव दुकानांमधून IMPDS पोर्टलवरील unautomated सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आले असून ज्या रास्तभाव दुकानांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करणेत आले नसतील अशा रास्तभाव धान्य दुकानदारांचे लॉगिन तालुका स्तरावर तयार करणेत येणार आहेत. राज्यातील  सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणुन ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच ऑफलाईन सुविधा फक्त माहे जुलै 2024 मधील अन्नधान्य वितरणाकरीता उपलब्ध रहाणार आहे. सर्व रास्तभाव धान्य दुकानदार व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केलेले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow