संगमेश्वर : देवरुखातील नळ पाणी योजनेला ५२ कोटींचा निधी मंजुर

Aug 1, 2024 - 11:18
Aug 1, 2024 - 11:53
 0
संगमेश्वर : देवरुखातील नळ पाणी योजनेला ५२ कोटींचा निधी मंजुर

देवरूख : देवरूख नगरपंचायत माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या कारकिर्दीत सादर केलेल्या शहराच्या पाणी योजनेच्या डीपीआरला (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी ५२ कोटी रुपयांचा निधी लागणार असून तो मंजूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. देवरूखवासीयांना २४ तास पिण्याचे पाणी नळ योजनेद्वारे देण्याचा मानस ठेवून देवरूख नगरपंचायत नगराध्यक्षा मृणाल शेट्ये आणि त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी पाणी योजनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. नगरपंचायत मुख्याधिकारी चेतन विसपुते, पाणी विभागाच्या सर्व कर्मचारी आणि नाशिकचे राहुल सूर्यवंशी यांनी या योजनेचा डीपीआर बनविण्यास खूप मेहनत घेतली. देवरूख शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी एका बंधाऱ्याची आवश्यकता होती. त्यासाठी वाढीव बंधारा व असलेल्या बंधाऱ्याची उंची वाढवण्यासाठी सर्व्हेदेखील करण्यात आला. याचप्रमाणे संपूर्ण देवरूखला पाईपलाईन याबाबतची पाहणी केंद्रीय संस्थेकडून करण्यात आली. 

याचप्रमाणे अगामी २५ वर्षांचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. वाढीव बंधारा व निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी करताच तातडीने ६ कोटी रुपये मंजूर केले. पाणी योजनेस तांत्रिक मंजुरी मिळवणे हा यामधील महत्त्वाचा टप्पा होता. याकरिता आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow