मुंबई-गोवा महामार्गावर ५० हजार झाडे लावण्याचे काम सुरु

Aug 2, 2024 - 13:22
Aug 2, 2024 - 13:25
 0
मुंबई-गोवा महामार्गावर ५० हजार झाडे लावण्याचे काम सुरु

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी से लांजा तालुक्यातील वाफेड या टप्प्यात सुमारे ५० हजार झाडे महामार्ग दुतर्फा लावण्याचे काम सुरू झाले आहे. ३ कोटी २२ लाख रूपये या वृक्ष लागवडीवर खर्च होणार आहेत. चौपदरीकरणाच्या कामात बावनदी ते चाफेड या दरम्यान २३ हजार झाडांची तोड करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने वृक्षप्रेमींच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई महामार्ग हरित महामार्ग होईल, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. या महामार्गावर पुन्हा नव्याने देशी वाणाचे वृक्ष लावण्याचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई-गोवा महामार्गाचे उपअभियंता अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले, बावनदी ते वाकेड ठिकाणच्या रस्त्याच्या दुत देशी वाणाची सुमारे ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. इकल कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. या अगोदर चौपदकरीकरणाच्या कामात २३ हजार झाडांची तोड झाली आहे. वनविभागाचे सहकार्य घेऊन पावसाळ्यात वृक्ष
लगवडीसाठी कोकणातल्या मातीत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, नीम, ताम्हण, कदंब, कांचन, आवळा, अर्जुन, आषय, महोगनी, पिंपळ, पांढरा शेवगा, जांभूळ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. 

वृक्ष लागवडीचे तंत्र निश्चित केले जाणार आहे रस्त्याच्या दुतर्फा गटार सोडून एक मीटरपासून वृक्ष लागवडीस सुरुवात होईल, सात मीटर अंतरावर झाडे लावण्यात येतील, पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या टप्प्यात उंच वाढणारी झाडे असतील. चढत्या क्रमाने झाडे लावली तर ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही आणि पर्यावरणावर होणारे परिणाम
टाळता येतील. झाडे मिळवण्यासाठी कंत्राटदाराने जवळच्या नर्सरीधारक किंवा वनविभागाची मदत घ्यावयाची आहे.

 प्रतिकिलोमीटरला ५३८ झाडे लावण्यात येणार आहेत. त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्चित केले आहे. लागवड केलेल्या झाडांची देखभाल १५ वर्षे संबंधित ठेकेदाराला करावी लागणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow